breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

‘तसाच’ निर्णय ईडीबाबतही घेण्याची गरज – हसन मुश्रीफ

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. याबाबत राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्ला चढवला. ईडीची नोटीस ही राजकीय सूडबुद्धीने केलेले कृत्य आहे, असा आरोप शिवसेने मंत्री आदित्य ठाकरेंनी केला. यातच राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ईडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीचे नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “ज्या पद्धतीने सीबीआयला महाराष्ट्रात तपास करायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते. तसाच निर्णय ईडीबाबतही घेण्याची गरज आहे,” असे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. ते पत्रकारांशी बोलत होते.

वाचाः 22 आमदारांना ईडीची नोटीस, राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव; राऊतांचा गौप्यस्फोट

“ईडीचा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे. सुरुवातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस देण्यात आली. त्यानंतर मलाही नोटीस दिली. एकनाथ खडसे यांनाही नोटीस दिली आहे. त्यांनतर संजय राऊत यांच्या पत्नी यांनादेखील ईडीने नोटीस दिली आहे. हे सर्व सूडबुद्धीने होत आहे. ज्या पद्धतीने सीबीआयला महाराष्ट्रात परवानगीशिवाय येता येणार नाही, असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. तसाच निर्णय ईडीबाबतही घेण्याची गरज आहे. सध्या जे काही सुरु आहे त्यावरुन लोक ईडीविरोधात रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती आहे,” असे हसन मुश्रीफ म्हणाले.

वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button