ताज्या घडामोडी

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका कर्मचा-यांचा सत्कार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे आरोग्य अधिकारी, महापालिकेचे 52 कर्मचारी आणि खासगी संस्थेचे 63 कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

निगडी प्राधिकरणातील भविष्यनिर्वाह निधी कार्यालयासमोर आज हा कार्यक्रम घेण्यात आला. महापालिकेचे आरोग्य अधिकारी, ५२ पालिका कर्मचारी आणि खाजगी संस्थेचे ६३ कर्मचारी यांचा स्वेटर देवून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक राजू मिसाळ, निलेश पांढारकर, प्रवक्ते फजल शेख, सहा. आयुक्त आशा दुरगुडे, आरोग्य निरीक्षक बापूसाहेब गायकवाड, भारती फरांदे, पुष्पा शेळके, कविता खराडे, मनिषा गटकळ,  गंगा धेंडे, वर्षा जगताप, आशा शिंदे, लता पिंपळे, सिंधु पांढारकर, सविता धुमाळ, संजय लंके, विशाल काळभोर, सुशिल मुथीयन, रामेश्वर लाहोटी, राम तावरे, शंकर शिर्के इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा पल्लवी पांढरे यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व महीला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सुनिल चासकर यांच्या “हेरंब ग्राफिक्स” या शोरूमला सर्व सदस्यांनी भेट दिली. त्यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा “रायगड स्थित ‍शिवप्रतिमा” देवून सत्कार केला, तसेच इतरांना “रखुमाई मुर्ती” देण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमास विशेष सहकार्य मीरा कुदळे, आशा मराठे, कमल शेलार, सीमा हिमणे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुष्पा शेळके यांनी केले. आभार अमोल भोईटे यांनी मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button