breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळेगाव नगरपरिषदेतील ठेकेदारांची बीले ८ महिन्यांपासून रखडली!

लेखा अधिकाऱ्यांकडून कोविड ड्यूटीचे कारण

तळेगाव । प्रतिनिधी

तळेगाव नगरपरिषदेच्या विविध विभागाच्या ठेकेदारांची 8 ते 9 महिन्यांपासून रखडलेली बिले त्वरित देण्याची मागणी ठेकेदारांनी मुख्याधिकारी दीपक झिंजाड व लेखा अधिकारी अजित खरात यांच्याकडे सोमवारी (दि. 24) केली. मात्र “कोविड ड्युटी’वर असल्याने बिले अदा करता आली नाही, हे कारण लेखाधिकाऱ्यांनी दिले आहे.

नगरपरिषदेच्या आरोग्य, उद्यान, बांधकाम, विद्युत, भांडार व पाणीपुरवठा विभागाच्या ठेकेदारांची बिले नोव्हेंबर ते डिसेंबर 2019 रखडलेली आहेत. ठेकेदारांनी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन कामगारांचे पगार दिले. त्या रकमेचे व्याज भरत असून, ठेकेदारावर उपासमारीची वेळ आली आहे.

मावळ तालुक्‍यातील श्रीमंत नगरपरिषदेच्या आरोग्य, उद्यान, बांधकाम, विद्युत, भांडार व पाणीपुरवठा विभागात शेकडो कंत्राटी कामगार काम करीत आहेत. त्यांच्या ठेकेदाराला नोव्हेंबर ते डिसेंबर 2019 पासून अद्यापही बिले नगरपरिषदकडून मिळाली नाहीत. पण कामगारांच्या कुटुंबाचा विचार करता, ठेकेदारांनी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले आहे. खासगी सावकार वारंवार ठेकेदारांना मुद्दल व व्याज जमा करण्याची मागणी करीत आहेत. ठेकेदार रखडलेली बिले मागणी करण्यासाठी नगरपरिषदेच्या लेखा विभागात चकरा मारत आहेत.

पण लेखा अधिकारी अजित खरात यांची नियुक्‍ती तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये लूट होणाऱ्या रुग्णांची बिले तपासण्यासाठी केली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या ठेकेदारांची बिले काढण्यासाठी मुख्याधिकारी व लेखा अधिकारी यांना वेळ नाही. करोनाच्या लॉकडाऊनमध्ये ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने ठेकेदारांची 8 ते 9 महिन्यांपासून रखडलेली बिले त्वरित देण्याची मागणी केली आहे.

तळेगाव नगरपरिषदेकडे निधी उपलब्ध आहे, परंतु माझी नियुक्ती तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक लूट झालेली रुग्णांच्या बिलाची तपासणीच्या कामात व्यस्त आहे.

– अजित खरात, लेखाधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button