breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढला तर संजय राठोड नॉट रिचेबल

 

मुंबई – परळी येथील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्य करण्यावरून दोन व्यक्तींतील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या आत्महत्येमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हीडिओ ट्विट करुन संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, इतक्या सगळ्या गदारोळानंतरही संजय राठोड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे संजय राठोड आहेत तरी कुठे?असा सवाल उपस्थित होत आहे.
वाघ यांनी म्हटले आहे की, गृहमंत्रीजी सध्या राज्यातील महिला अत्याचारावबाबत “संजय”ची म्हणजेच जे जे दिसेल ते ते पहावे ते साथी सत्ताधाऱ्यांना कथन करत क्लीनचीट देत पुढे चालावेच्या भुमिकेत दिसताहेत‬. पूजा चव्हाण केसमध्ये मोबाईलच मोठा पुरावा आहे. १२ संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत.ज्यात तिला आत्महत्येस परावृत्त करण्यापासून तर आत्महत्या झाल्यानंतर कसही करून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना कथित मंत्र्याकडून कुण्या अरूणला होताना सगळ्यांनी ऐकल्या‬, अजूनही याबद्दल पोलिस काहीही स्पष्टता देत नाही.

गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांकडून संजय राठोड यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, संजय राठोड यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. त्यामुळे आता संजय राठोड आपले मौन नक्की कधी सोडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारवर दबाव वाढताना दिसतो आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आतापर्यंत दबक्या आवाजात संजय राठोड यांचं घेतलं जाणारं नाव आता उघडपणे घेतलं जात आहे. त्यामुळेच संजय राठोड प्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढतो आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button