breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेश मूर्तीकारांना कोरोनाचा फटका; आर्थिक अडचणी वाढीस

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे सावटअधिक वेगाने पसरत चालले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊनच्या काही निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली असली तरीदेखील बेरोजगारीसारख्या प्रश्नांनी डोके वर काढली आहे. एवढेच नव्हेतर, अनेक व्यवसायांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे. याच लॉकडाऊनचा फटका गणेश मूर्तीकारांनाही बसला आहे.त्यांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जाव लागत आहे. गणेशोत्सवाला जेमतेम दिवस उरले असताना अद्याप एकाही मूर्तीची बुकींग न झाल्याचे अनेक मुर्तीकारांच म्हणन आहे. आम्ही या उत्सवावर अवलंबून आहोत. मात्र, कोरोनाच्या भितीपोटी लोक घराबाहेर पडण्यास टाळत आहे.

कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. परिणामी अनेक धार्मिक, सास्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द किंवा निर्बंधांखाली साजरी करावी लागली आहेत. तसेच दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार गणेशोत्सव यंदा शांततेत पार पाडला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे यावर्षी राज्य शासनाने चार फूटांहून अधिक उंचीच्या मूर्तीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मुर्तिकार आधिक अडचणीत आले आहेत. तर, दुसरीकडे गणेश मूर्तीची मागणीतही घट झाल्याने मूर्तीकारांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button