breaking-newsताज्या घडामोडीपुणे

…तर आमचा पायगुण वाईट आहे, असं म्हणू नका – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे |महाईन्यूज|

‘म्हाडाच्या घरासाठी नंबर निघाला तर आमच्याबद्दल चांगलं बोला, नाही आला तर आमचा पायगुण वाईट आहे असं म्हणू नका.” असे वक्तव्य अजित पवार यांनी केली. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) कार्यक्षेत्रातील पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाच हजार ६४७ सदनिका विक्रीसाठी ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज होणार आहे. म्हाडाच्या ऑनलाईन सोडतीचा कार्यक्रमासाठी नेहरू मेमोरियल हॉल येथे पवार दाखल झाले आहेत.

कुणाचं गृहस्वप्न साकारणार? हे आज उलगडणार आहे. १ लाख १३ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. यामध्ये ९२ हजार पेक्षा जास्त लोकांनी पैसै भरले आहे. ९८ कोटी डिपाॅजिटमधून मिळाले. ज्यांना लाॅटरी लागली नाही त्यांना ३ दिवसात पैसे परत केले जाणार आहेत. ‘गरीब, मध्यमवर्गीयांनाही घर मिळावं म्हणून म्हाडाने ही योजना राबवलेली आहे. म्हाडाचा व्यवहार भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आहे. कोणी पैसे घेवून घर मिळवून देतो म्हटलं तर पोलिसांत तक्रार करा. आपल्याला ही पारदर्शकता टिकवायची आहे.”असेही पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, ”विकास करत असताना झाडं तोडणे चुकीचे, आपण झाडं लावली पाहिजे. नवीन इमारती बांधताना पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे. पर्यावरण नष्ट झालं तर त्याचा फटका वन्य प्राण्यांना बसतोय. उद्या माणसांना बसेल.”

प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे (चाकण) येथे ५१४, तळेगाव दाभाडे येथे २९६, सोलापूर जिल्ह्यात गट क्रमांक २३८/१, २३९ करमाळा येथे ७७ आणि सांगली येथे सर्व्हे क्रमांक २१५/३ येथे ७४ सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. पुणे जिल्ह्यातील मोरवाडी पिंपरी येथे ८७, पिंपरी वाघेरे येथे ९९२ सदनिका आहेत. सांगली येथे १२९ सदनिका आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे येथे एक हजार ८८०, दिवे येथे १४ तर सासवड येथे चार सदनिका आहेत. सोलापूर जिल्ह्यात ८२ सदनिका आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात ४१०, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात एक हजार २० आणि कोल्हापूर महापालिका येथे ६८ सदनिका आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button