breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा ७७८ कोटी ८७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

पिंपरी |महाईन्यूज| 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) २०२१-२०२२ चा ७७८ कोटी ८७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. प्राधिकरणाची ३४८ वी सभा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २१) झाली. आरंभीची शिल्लक ९०१.६९ कोटी असून, भांडवली खर्च ६८१.२७ कोटी व महसुली जमा ४.४० कोटी इतकी आहे. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे पेठ क्रमांक १२, टप्पा क्रमांक दोनमध्ये ६३०९ घरांचा शंभर कोटींचा गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहे. पीएमआरडीए विलीनीकरण आरक्षित, मोकळे व वापरलेले भूखंड यावर पीसीएनटीडीए आयुक्तांनी चुप्पी साधली.

पीसीएनटीडीएचा अर्थसंकल्प प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सदस्य सचिव बन्सी गवळी यांनी सभेपुढे सादर केला. प्राधिकरणाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक देशमुख यावेळी उपस्थित होते. अर्थसंकल्प ७७८ कोटी ८७ लाख ९२ हजार रकमेचा असून, त्यात ७७० कोटी ९ लाख २२ हजार एवढा खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच ८ कोटी ७८ लाख ७० हजार शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदी…

चिंचवड जुना जकात नाका ते रावेत रस्ता : ३.८३ कोटी
चिंचवड जुना जकात नाका ते शिवाजी चौक : २० कोटी
त्रिवेणीनगर येथील स्पाईन रस्ता : ६ कोटी
वाकड येथे पाण्याची टाकी : १.६५ कोटी
विविध पेठांमध्ये महिला व पुरुषांकरिता स्वछतागृह : १ कोटी
विविध पेठांमध्ये वृक्षारोपण : ०.५ कोटी
पेठ क्र. ६ भूखंड क्र. ८७ ते ९०४ मधील गृहयोजना : ६ कोटी
पेठ क्र. १२ गृहयोजना (३३१७ इडब्ल्यूएस, १५६६ एलआयजी) : २८० कोटी
पेठ क्र. ३० व ३२ वाल्हेकरवाडी गृहयोजना : ४१ कोटी
पेठ क्र. ३० शॉपिंग सेंटर : १.६० कोटी
पेठ क्र. १२ येथील गृहयोजनेत लॅंडस्केप, क्‍लबहाऊस : ८ कोटी
पेठ क्र. २९ ते ४२ मधील भूखंडांना सीमाभिंत/चेनलिंक फेन्सिंग करणे : ३ कोटी
पेठ क्र.२४ मधील व्यापारी भूखंडामध्ये व्यापारी केंद्र : ४ कोटी
नवीन प्रशासकीय इमारतीची देखभाल दुरुस्ती : ०.५० कोटी
अतिक्रमण निर्मूलन खर्च : १ कोटी
पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कन्व्हेंशन केंद्र व मोशी येथील बहिर्गत केंद्र : १.२५ कोटी
पेठ क्र.१२ येथे सबस्टेशन उभारणी : ८.५० कोटी

नवीन विकासकामे…

विविध पेठांतील रस्ते व डीपी विकसित करणे : ११ कोटी
पेठ क्र. १२ गृहयोजना : १०० कोटी
पेठ क्र. १ ते २२ गृहयोजना : २ कोटी
विविध पेठांतील गृहयोजना प्रकल्प : १ कोटी
पेठ क्र. १२ भाजी मंडई : २ कोटी
पेठ क्र. १२ शॉपिंग सेंटर : ३ कोटी
पेठ क्र. २५ वाहनतळ विकसित करणे : ०.८० कोटी
सर्व्हे. क्र. ११, थेरगाव येथे ग्रंथालय/अभ्यासिका : २ कोटी
पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (पीआयईसीसी) : १०० कोटी
भूखंडाचे मॅपिंग, डिजीटायझेशन, ऑनलाइन हस्तांतरण : ३ कोटी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button