breaking-newsमनोरंजन

अमेरिकेचा ब्लॅक पँथर चाडविक बॉसमनचे निधन

वॉशिंग्टन – अमेरिकेचा सुपरहिरो आणि ब्लॅक पॅंथर या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता चाडविक बॉसमन याचे वयाच्या ४३ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. लॉसएंजेल्समध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला तेव्हा कुटुंबीय आणि पत्नी त्याच्या सोबतच होते, असे त्याच्या प्रसिद्धीप्रमुखांनी सांगितले.
एक खरा योद्धा चाडविकने आपल्या जीवनात संघर्ष करून चांगले चित्रपट लोकांसमोर आणले. त्यामुळे लोकांनीही त्याला भरभरून प्रेम दिले. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत तो बनला होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. ४ वर्षांपूर्वी चाडविकला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. परंतु त्यानंतरही त्याने न डगमगता आपला अभिनय सुरू ठेवला होता. केमोथेरपी आणि सर्जरी करत करत त्याने अनेक चित्रपट पूर्ण केले होते. ब्लॅक पॅंथरमधील सम्राटाची त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. त्याचे इतरही अनेक चित्रपट गाजले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button