breaking-newsमहाराष्ट्र

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलिन

खामगाव : राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी पांडुरंग फुंडकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने संपूर्ण खामगावावर शोककळा पसरली आहे. फुंडकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी खामगावात जनसागर लोटला होता. अत्यंत शोकाकूल वातावरणात पांडुरंग फुंडकर यांना निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते पांडुरंग फुंडकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं गुरूवारी मुंबईतील के. जे. सोमय्या रुग्णालयात निधन झालं. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमय्या यांना बुधवारी सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. रात्री त्यांची प्रकृती ठिक होती. पण रात्री साडे बारा ते एकच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यावेळी डॉक्टरही सोबत होते. पण हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.

साधारणपणे वीस दिवस आधी भाऊसाहेब फुंडकर यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. त्यावेळी प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून सकाळी दहा वाजता त्यांना के जे सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.  पण रात्री आठ वाजता पुन्हा श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला आणि रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ सुनीता फुंडकर, मुलगा सागर  फुंडकर त्यांचे नजिकचे स्नेही अनिलभाई राजभोर तसेच अन्य नातेवाईकही हजर होते. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button