breaking-newsआंतरराष्टीय

25 सेकंद अगोदर ट्रेन सोडल्याबद्दल जपानी रेल्वेचा जाहीर माफीनामा

टोकियो (जपान) – फक्त 25 सेकंद अगोदर ट्रेन सोडली म्हणून रेल्वेने जाहीर माफी मगितल्याचे कोणी कधी ऐकले नसेल. पण जपानमध्ये अशी घटना घडली आहे. वक्तशीरपणाबद्दल जगभर प्रसिद्ध असलेल्या पश्‍चिम रेल्वेने प्रवाशांची अशी जाहीर माफी मागितली असली तरीही जपानी नागरिकांनी सोशल मीडियावर या प्रकाराबाबत रेल्वेवर टीकेची झोड उठवली आहे. जपानसाठी ही शरमेची गोष्ट असल्याचे एका नागरिकाने सोशल मीडियावर म्हटले आहे.

नोटोगोव्हा स्टेशनवरून ही ट्रेन सकाळी 7.11 वाजता सुटणार असल्याचा ट्रेनच्या चालकाचा समज झाला. प्रत्यक्षात ट्रेनची सुटण्याची वेळ 7.12 होती. त्याने ट्रेनचे दरवाजे बंद केले. आपण लवकर निघत आहोत अशी कंडक्‍टरला शंका आली, पण स्टेशनवर एकही प्रवासी न दिसल्याने त्याने 25 सेकंद अगोदर ट्रेन सोडली. या चुकीमुळे एका प्रवाशाला ट्रेन चुकली. त्याने त्याबाबत स्टेशन मास्टरकडे तक्रार केली. त्यांने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ती उच्च अधिकऱ्यांपर्यत नेली. रेल्वेने या चुकीबद्दल वृत्तपत्रात जाहिरात देऊन प्रवाशांची जाहीर माफी मागितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button