breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुणाचा कोयत्याने भोसकून निर्घृण खून

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्विन रवी राजगोपाल (वय १९) असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या मदतीसाठी आलेले इतर दोघेजण जखमी झाले. क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल अशी जखमींची नावे आहेत. ही घटना दापोडीमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी क्लेरा रॉबर्ट किट्टो यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक राजू चव्हाण (वय २६), रुपेश दिलीप संकपाळ (वय २०), राहुल वीर उर्फ पप्प्या (वय २०), निखील (पूर्ण नाव माहित नाही), सनी गजभीव (२०, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक चव्हाण, रुपेश संकपाळ, राहुल उर्फ पप्प्या, निखील (पूर्ण नाव समजू शकले नाही), सनी गजभीव यांची अल्विन सोबत काही दिवसापूर्वी वाद होवून भांडण झाले होते. या भांडणाचा राग डोक्यात ठेवत या तरूणानी अल्विनवर शनिवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्यात अल्विनच्या डोक्यात कोयत्याने वार करत दगडाने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. यावेळी अल्विनच्या मदतीसाठी आलेल्या क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल यांनाही हल्लेखोरांनी मारहाण करून जखमी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button