breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तब्बल 70 वर्षांनंतर उडणाऱ्या खारूताईची पहायला मिळाली झलक

सुमारे 70 वर्षांपूर्वी विलुप्त झालेल्या उडणाऱ्या खारीची एक विशेष प्रजाती उत्तराखंडातील गंगोत्री राष्ट्रीय उद्यानात पहायला मिळाली. Woolly Squirrel या दुर्मिळ प्रजातीची ही खार हवेत उडू शकते हे तिचं वैशिष्ठ्य आहे.आणि तब्बल 70 वर्षांनंतर ही खारूताई पहायला मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाच्या रेड लिस्टमध्ये नोंद असलेली ही खार आजपासून ७० वर्षांपूर्वी लुप्त झाली होती. एका सर्वेक्षणानुसार, राज्याच्या 18 वन विभागांपैकी13 विभागांमध्ये या खारीचे अस्तित्व दिसले आहे.

डेहराडूनमध्ये वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी भागीरथ खोऱ्यात देखील अशा प्रकारच्या खारीचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट केले आहे. या खारुताईचे एक दुर्मिळ छायाचित्र देखील मिळाले आहे. ही खारुताई आपल्या पंजामधील पडद्यांचा पॅराशूटसारखा उपयोग करत हवेत उडते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button