breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीचा समावेश

मुंबई | महाईन्यूज

मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्वेकडील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये चालविले जाणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उध्वस्त केले आहे. पोलिसांनी छापा टाकून २९ वर्षीय महिलेला अटक करण्यात आलेले आहे. तसेच तीन अभिनेत्रींची देखील सुटका करण्यात आलेली आहे. सुटका केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. गेल्या १५ दिवसातील ही तिसरी कारवाई आहे. या तिन्ही प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असल्याचे पाहायला मिळत आहे.

समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान एका अल्पवयीन मुलीसह तीन महिला आढळून आल्या आहेत. त्यांची सुटका करण्यात आली आहे. तर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडणाऱ्या प्रिया शर्माला बेड्या ठोकण्यात आल्या. शर्मा ही कांदिवली पूर्व येथे टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी चालवते. तसेच ती सेक्स रॅकेट देखील चालवत असल्याची माहिती मिळाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button