breaking-newsआंतरराष्टीय

सेशेल्सचा भारताला झटका – ऍसम्प्शन बेटावरील नौदल तळ करार रद्द

व्हिक्‍टोरिया (सेशेल्स) – ऍसम्प्शन बेटावरील नौदल तळ करार रद्द करून सेशेल्स या देशाने भारताला झटका दिला आहे. सेशेल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉरे यांनी भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी ऍसम्प्शन बेटावरील नौदल तळ करार रद्द केल्याची घोषणा केली आहे. भारताबरोबर तळाचे काम करण्याऐवजी सेल्शेल्स स्वत:च लष्करी सुविधा निर्माण करील. ऍसम्प्शन बेटावर नौदल तळ परियोजनेचा करार सन 2-15 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स भेटीत करण्यात आला होता. हा करार गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र काही दिवसांपूर्वी या कराराची बातामी फुटली, आणि सेशेल्समध्ये विरोधी पक्षांनी फॉरे यांना विरोध सुरू केला. परिणामी फॉरे यांना करार रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

सेशेल्सची राजधानी माहेच्या दक्षिण-पश्‍चिमेस असलेल्या असम्प्शन बेटावर नौदल तळ उभारण्याचा प्रयत्न भारत फार पूर्वीपासून करत आहे. लष्करी रणनीतीच्य दृष्टीने असम्प्शन बेटावरील नौदल तळ महत्त्वाचा आहे. करारानुसार 20 वर्षे भारताला या नौदल तऴाचा वापर करता येणार होता.

या वर्षाच्या सुरुवातीला कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले होते. परंतु मार्च 2018 मध्ये या करारातील काही भाग ऑनलाईन लीक झाल्यामुळे फॉरे यांना करार रद्द करण्याची पाळी आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button