breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तब्बल अडीच कोटी खर्चूनही पं. दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुलाची पाच महिन्यात दुरवस्था

सत्तारुढ पक्षनेत्यांचे दुर्लक्ष; स्वच्छतागृहात दुर्गंधी, झाडांची कत्तल अन्ं राडारोडा जागेवरच पडून

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अडीच कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पुर्णानगर येथील पंडीत दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुलाची पाच महिन्यात दुरवस्था झाली आहे. त्यात क्रीडासंकुलातील झाडांची कत्तल, राडारोडा आणि स्वच्छतागृहात दुर्गंधी येवू लागल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, क्रीडासंकुलाच्या देखभालीकडे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांचेही दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील पूर्णानगर परिसरात सी.डी.सी-२ या मोकळ्या जागेवर पंडीत दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुल विकसित केले आहे. त्याचे सप्टेंबर २०१९ मध्ये उद्घाटन करुन नागरिकांसाठी खुले केले आहे. या क्रीडा संकुलात स्केटिंग रिंग, कबड्डी ग्राउंड, टेनिस ग्राउंड, सरावासाठी क्रिकेट पिच आणि नागरिकांना चालण्यासाठी ५४० मीटर जॉगिंग ट्रॅक, ४०० मीटर स्टेडियम विकसित केले आहे. या कामावर सुमारे 2 कोटी 40 लाख 90 हजार 700 रुपये खर्चून विकसित केले आहे.

या क्रीडासंकुलाचे काम पुर्ण होवून पाच महिने उलटले आहेत. त्यानंतर क्रीडासंकुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. क्रीडासंकुलातील स्वच्छता गृहात दुर्गंधी पसरलेली आहे. दररोज साफसफाई होत नाही. झाडांची कत्तल देखील केलेली आहे. सुरक्षारक्षकही काम करीत नाहीत. राडारोडा जागोजागी पडलेला आहे. पाण्याचे पाईप अस्थावस्थ पडलेले आहेत. खुर्च्यांही गंजलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांची क्रीडासंकुलाची विल्हेवाट लागली आहे.

या क्रीडासंकुलाकडे खुद्द सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही दुर्लक्ष केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने हे काम करण्यात आले होते. मात्र, महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्चूनही क्रीडासंकुलाची दुरवस्था झाल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत जागृत नागरिक महासंघाचे नितीन यादव यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे तक्रार केलेली आहे. कोट्यावधी रुपये खर्चूनही पं दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुलाची दुरवस्था होणे ही लाजीरवाणी बाब आहे. स्वच्छतागृहात दुर्गंधी खाईत लोटले आहेत. संबंधित आरोग्य अधिकारी आणि स्थापत्य अधिका-यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button