breaking-newsTOP Newsराष्ट्रिय

देशात आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची सुरुवात – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – कोरोनाची लस कधी तयार होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. देशाचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत अखंडपणे तपस्या करत आहेत, संशोधन करत आहेत. भारतात एक नाही, दोन नाही तर तीन तीन लस तयार होत आहेत. त्यांची चाचणी होत आहे. त्यांना वैज्ञानिकांकडून परवानगी मिळाल्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणात उत्पन्न केलं जाईल. लस तयार झाल्यावर देशभरात वितरित करण्याचं प्लॅनिंग देखील तयार आहे.

देशाच्या आरोग्य क्षेत्रात आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची सुरुवात आहे. ही भारतात मोठी क्रांती करेल. उपचारात खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यासाठी भारतातील प्रत्येकाला एक आरोग्य कार्ड देण्यात येईल. त्यात त्या नागरिकाच्या आरोग्याची सर्व माहिती त्या कार्डात असेल. या मिशनमुळे नागरिकांना मोठी मदत होणार आहे. त्यांना उपचार घेणं सोप होणार आहे.

आपल्या देशात कोरोनाच्या आधी केवळ एक प्रयोगशाळा होती. आता १४०० पेक्षा अधिक प्रयोगशाळा आहेत. ३०० पासून ७ लाख कोरोना चाचणीपर्यंतचा टप्पा भारताने गाढला आहे. ५ वर्षात ३५ हजार वैद्यकीय शिक्षणाच्या संधी तयार झाल्या.

कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न, वैज्ञानिक कठोर मेहनत करत आहेत, भारतात तीन लसी विविध टप्प्यात आहेत. प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार आहे. राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन आजपासून प्रत्येकाला ओळखपत्र मिळणार, तुमचे आजार, औषधे, डॉक्टरांनी केलेलं निदान याची माहिती एकाच कार्डवर असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button