breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शताब्दी एक्स्प्रेसमधला ब्रेड अनारोग्यदायी, अहवालातून समोर

मुंबई | महाईन्यूज

अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ७ जानेवारीला प्रवाशांना खाण्यासाठी देण्यात आलेला ब्रेड हा धोकादायक असल्याचं पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत चौकशी अहवालातून समोर आलं आहे. ब्रेड- बटरपैकी ब्रेडमध्ये बुरशी आढळली आहे, तर बटर सुरक्षित असून त्याचं योग्य पॅकेजिंग मात्र केलं नव्हतं असं चौकशी अहवालात आढळून आलं आहे. प्रवाशांना खराब ब्रेड दिल्याबद्दल आयआरसीटीसीनं कंत्राटदाराला २ लाखांचा दंड ठोठावला असून त्याचं कंत्राट रद्द केलेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक्स्प्रेसमध्ये खराब दर्जाचं अन्नपदार्थ प्रवाशांना दिलं जात असल्याच्या तक्रारी वारंवार प्रवाशांकडून येत आहेत. ७ जानेवारी रोजी मुंबई- अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये खाण्यासाठी विकत घेतलेला ब्रेड बटर खराब होता अशी तक्रार ३६ प्रवाशांनी केलेली होती. प्रवाशांच्या तक्रारीनंतर ८ जानेवारीला पश्चिम रेल्वेनं अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली या समितीनं १६ जानेवारीला अहवाल पश्चिम रेल्वेला सादर केला आहे. यात ब्रेड हा अनारोग्य आणि धोकादायक असल्याचं समोर आलेलं आहे. 

——————————————————————————————————————-
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |  

——————————————————————————————————————–

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button