breaking-newsराष्ट्रिय

सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभागी लष्कर अधिकारी लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी

भारतीय लष्करातील एक वरिष्ठ अधिकारी महिला अधिकाऱ्याचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात दोषी आढळला आहे. लष्कर कोर्ट मार्शल प्रक्रियेत मेजर जनरल पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला सेवेतून निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी एका कॅप्टन रँक असलेल्या महिला अधिकाऱ्याने नागालँडमधील या अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 रोजी म्यानमारमध्ये सीमारेषा पार करुन करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये या अधिकाऱ्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्जिकल स्ट्राइकदरम्यान दाखवलेल्या शौर्यामुळे अधिकाऱ्याला बढती देण्यात आली होती. दोषी आढळलेल्या अधिकाऱ्याने मात्र सर्व आरोप फेटाळले असून लष्करातील अंतर्गत राजकारणाचा आपण बळी ठरल्याचा दावा केला आहे. काही लोकांनी आपल्याविरोधात कट रचत अडकवलं असल्याचं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.

ANI

@ANI

An Army General Court Martial has recommended dismissal of a Major General from service in a two-year-old sexual harassment case. “He has been charged under section 354A of the IPC and Army Act 45 which is related to unbecoming conduct of officers in the force,” Sources to ANI

23 people are talking about this

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेजर जनरलविरोधात करण्यात आलेल्या कोर्ट मार्शलच्या निर्णयाला अद्याप वरिष्ठ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सहमती मिळालेली नाही. यामध्ये लष्करप्रमुख बिपीन रावत यांचाही समावेश आहे. लष्कराच्या नियमानुसार ही परवानगी घेणं अनिवार्य आहे.

ANI

@ANI

An Army General Court Martial has recommended dismissal of a Major General from service in a two-year-old sexual harassment case. “He has been charged under section 354A of the IPC and Army Act 45 which is related to unbecoming conduct of officers in the force,” Sources to ANI

23 people are talking about this

कोर्ट मार्शल वेस्टर्न आर्मी कमांड चंडीमंदिर येथे करण्यात आला. लेफ्टनंट जनरल रँकच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षेताखील संपूर्ण कारवाई करण्यात आली. तपास पथकाने अधिकाऱ्याला कलम 354A आणि 45 अंतर्गत दोषी ठरवलं. आरोपानुसार, मेजर जनरलने महिला अधिकाऱ्याला आपल्या खोलीत बोलावलं होतं आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत गैरव्यवहार केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button