breaking-newsपुणेमहाराष्ट्र

डॉ. साईकृष्णन यांना प्रतिष्ठेचा भटनागर पुरस्कार

पुणे | महाईन्यूज | प्रतीनिधी

विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा शांतिस्वरुप भटनानगर पुरस्कार भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) संशोधक डॉ. कायारत साईकृष्णन यांना जाहीर झाला आहे. देशभरातील बारा संशोधकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेतर्फे (सीएसआयआर) २०१९ साठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. पुरस्कारार्थीमध्ये डॉ. साईकृष्णन यांच्यासह आयआयटी मुंबईचे डॉ. राघवन सुनोज, दिल्ली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजीतील डॉ. सौमेन बसक, बेंगळुरूच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजमधील डॉ. तपसकुमार माजी, आयआयटी मुंबईतील डॉ. सुबीमल घोष, बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील डॉ. माणिक वर्मा, चेन्नईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्समधील डॉ. दिशांत पांचोली, कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिक इन्स्टिटय़ूटमधील डॉ. नीना गुप्ता, दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीतील डॉ. धीरज कुमार, हैद्राबादच्या एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिटय़ूटमधील डॉ. मोहम्मद अली जावेद, बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील डॉ. अनिंदा सिन्हा आणि टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे डॉ. शंकर घोष यांचा समावेश आहे.

‘प्रतिष्ठेचा शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अतिशय आनंद झाला आहे. माझ्या संशोधनाची दखल या पुरस्काराच्या रुपाने घेतली गेली आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी आणि अधिक संशोधनासाठी हा पुरस्कार प्रोत्साहक ठरणार आहे,’ अशी भावना डॉ. साईकृष्णन यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button