breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

शूट थांबलं तरीही ‘राधे’च्या क्रू मेंबर्सना पगार

मुंबई | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर देशभरात सध्या लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टी आमि टेलिव्हिजन इंडस्ट्री पूर्णपणे बंद आहे. तरीही अभिनेता सलमान खानने त्याच्या आगामी ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ सिनेमाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. सलमानने त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत जे 26 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत सिनेमाच्या युनिटमध्ये सहभागी होते. मेकअप आर्टिस्ट सुभाष कपूर यांनी याबाबत पुष्टीकरण केलं आहे.

त्यांनी स्पॉट बॉयला याबाबतमी माहिती दिली. “त्यांनी खूप महान काम केलं आहे. मी मनापासून सलमान खान यांचे आभार मानतो. सध्याची वेळ अत्यंत कठीण आहे.”

सलमानने नुकतंच सिनेमा इंडस्ट्रीत दररोजच्या वेतनावर अवलंबून असणाऱ्या 25,000 पेक्षाजास्त कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला. ज्यांचे जीवनावर या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button