breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये विविध विकास कामांसाठी स्थायीकडून 29 कोटी रुपये मंजुर

  • स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांची माहिती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी सुमारे २8 कोटी 94 लाख 43 हजार रुपयांच्या खर्चास आज (बुधवार) स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

शहरातील महानगरपालिका मालकीच्या इमारतीमधील कार्यालय, दवाखाने, मनपा शाळा,उद्याने व इतर ठिकाणी असणा-या जमिनीवरील व छतावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पदधतीने साफसफाई व स्वच्छता करणेकामा येणा-या सुमारे १२ लाख ८७ रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयासाठी सन २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षात इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजनेसाठी येणाऱ्या सुमारे ३ कोटी २० लाख रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२ बोहाडेवाडी, बनकरवस्ती, बारणेवस्ती मध्ये ठिकठिकाणी रस्त्याचे कडेने पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी येणाऱ्या सुमारे २२ लाख २१ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१९ उद्योगनगर व प्रमुख रस्त्यांवर कलर पेव्हींग ब्लॉक, स्टॅम कॉक्रिट अद्ययावत पद्धतीने करणेकामी येणाऱ्या सुमारे २३ लाख ४२ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. थेरगाव डांगे चौक येथे बांधणेत येणाऱ्या अंडर पासमधील मरावी विद्युत वितरण
उच्च/लघुदाब विज वाहिन्या हलविणेकामी येणाऱ्या सुमारे ८८ लाख ९४ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्र.क्र.48 (नवीन प्र.क्र.27) येथील रहाटणी फाटा ते शिवाजी चौकापर्यंतच्या १८.०० मीटर रूंद रस्त्याचे क्राँकीटीकरण करणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी ९९ लाख नव्याण्णव हजार नउशे नव्याण्णव रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ३० मध्ये विविध सेवा वाहिन्यांसाठी होणाऱ्या खोदाईच्या ठिकाणी डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या सुमारे ७४ लाख ९५ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता
देण्यात आली.

प्रभाग क्र. ९ मध्ये ठिकठिकाणी रस्ते अद्ययावत पद्धतीने करणेकामी येणाऱ्या सुमारे ८३ लाख ७० हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मुलन विभागासाठी २१ पुरुष व ९ महिला होमगार्ड यांना ०१/०६/२०१९ ते दि.१९/०५/२०२० या कालावधीत कर्तव्यावर तैनात करण्यास तसेच त्यांचे एकूण मानधनाकामी येणा-या सुमारे ६० लाख ३० हजार
रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २ इंद्रायणी पार्क गणेशनगर तुपेवस्ती येथे रस्त्याच्याकडेने पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी येणाऱ्या सुमारे ३० लाख ४० हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मोहननगर परिसरात मोहननगर प्रवेशद्वार ते मेहता हॉस्पीटल डी.पी.रस्त्याचे क्राँकीटीकरण करणेकामी येणाऱ्या सुमारे १४ कोटी ८५ लाख रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button