breaking-newsमनोरंजन
डॉ. काशिनाथ घाणेकर’ आता नेटफ्लिक्सवर
दोन वर्षांपूर्वी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेता सुबोध भावेचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटाच्या टीझरपासून संवाद, गाणी यांची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाली होती. चित्रपटालाही पहिल्या दिवसापासून, पहिल्या शो पासून प्रेक्षकांचा ‘एकदम कडक’ प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. ‘नेटफ्लिक्स’वर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.