breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

खासदार सुप्रिया सुळे म्हणातात… पार्थ पवारांची ‘ती’ वैयक्तिक प्रतिक्रीया!

मुंबई । प्रतिनिधी

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का असा प्रश्न विचारत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. मात्र शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ‘जय श्री राम’ म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहिलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पार्थची ही वैयक्तिक भूमिका आहे. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच “सगळ्यांना दडपशाहीची इतकी सवय झाली आहे का की व्यक्तिस्वातंत्र्याचा विसर पडला आहे? असा सवालही त्यांनी विचारला.


अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. याबाबत पार्थ पवार यांनी ट्वीट करुन राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून ‘जय श्री राम’चा जयघोष केला. राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन केंद्र सरकार आणि पर्यायाने मोदींना टोला लगवणाऱ्या शरद पवार यांना पार्थ यांची भूमिका पटणार का असा प्रश्नही विचारला जात आहे.

याआधी पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारं पत्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button