breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांची फसवणूक करणारे उर्जामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी

पिंपरी / महाईन्यूज

उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात दिघी- वडमुखवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांना सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर, उपशहरध्यक्ष राजू सावळे, विशाल मानकरी, सचिव राहुल जाधव विभागाध्यक्ष दत्ता देवतरसे, संतोष यादव, दिग्विजय गवस, हेमंत तिवारी, प्रतिक शिंदे, सुधीर भालेराव, आकाश मोहिते, अभिजीत शिगंले, मयूर हजारे, रवीशेठ जाधव, आबा कापसे, गणेश लोणारी, तुषार बनसोडे, दत्ता धर्म, तानाजी चोरमले, विशाल ओव्हाळ आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले माफ करणे व तसेच सवलत देण्याची घोषणा उर्जामंत्र्यांनी केली होती. मात्र, आता सरसकट वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा बंद केला जाईल, असा फतवा ऊर्जामंत्री यांनी काढला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक करणा-या मंत्र्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत निवेदन देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button