Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघीतील रेडझोनच्या उद्यानात लाखो रुपयांचा निधी खर्च ; कागदोपत्री दाखविली विकासकामे

उद्यानातील भ्रष्टाचाराने दिघीकरांच्या स्वप्नाचा चक्काचूर  
पिंपरी – महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाने दिघीतील बालउद्यानाचे आरक्षण असलेल्या गायरान जमिनीवर लाखो रुपये निधी खर्च केला आहे. ही जागा रेडझोन हद्दीत येत असल्याचे अधिका-यांना माहिती असूनही त्या जागेवर लाखो रुपयांच्या निविदा राबवून विकास कामे काढली. परंतू, कागदोपत्री विकास कामे दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार महापालिका अधिका-यांनी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसंत रेगडे यांनी तक्रारीद्वारे केला आहे. 
दिघी येथील सर्व्हे क्रमांक 77 मध्ये सरकारी गायरान जागेत बालउद्यानाचे आरक्षण ठेवले आहे. सदरील जागा जिल्हाधिका-यांकडून देखभालीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकाने वर्ग करुन घेतली आहे. या जागेवर बालउद्यानाचे आरक्षण असले, तरीही ती जागा रेडझोनच्या निर्धारित क्षेत्रात येत आहे. रेडझोन असल्यामुळे विकास कामांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे त्या जागेवर उद्यान विकसित करता येत नाही. मात्र, महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागातील अधिका-यांनी त्या जागेवर लाखो रुपयांच्या निविदा राबविल्या आहेत. प्रत्यक्षात लाखो रुपये खर्च करुनही उद्यान विकसित झालेले नाही. आत्तापर्यंत त्या जागेवर कोट्यवधीच्या निविदा राबवून राजकीय नेतेमंडळी व अधिका-यांनी मलिदा लाटला आहे.  तसेच त्या जागेवर सन 2017 मध्ये निवडणुक धामधूमीत सुमारे 80 लाखांची विकासकामे दाखवून भ्रष्टाचार केला आहे.
महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाने दिघीतील उद्यानात नागरिकांना चालण्यासाठी ट्रॅक, स्त्री-पुरुषा साठी स॔डास-मुतारी, झाडांना संरक्षक जाळी, नागरिकांना बसण्यासाठी बेंच व्यवस्था, फुटपाथ व ब्लॉक रस्ता करणे, चोहीबाजूने संरक्षक भिंत घालणे,  वृक्षारोपण केल्याचे कागदोपत्री दाखविले आहे.  सध्यस्थितीत त्या उद्यानात अनाधिकृत मंदिरे उभारली आहे, कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत,  उद्यानची पुर्णपणे दुरावस्था झाली आहे,  मद्यपी व जुगार खेळणा-याची संख्या आधिक वाढली आहे,  तेथे अनैतिक धंद्याला चालना मिळू लागली आहे.
दरम्यान, दिघीतील नागरिकांनी वारंवार आरक्षणे विकसित करण्याची मागणी केली आहे. त्याकडे नगरसेवक, आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. सध्यस्थितीत दिघीकरांना कुणीही वाली नाही, अशी खंत  नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते वसंत रेगडे म्हणाले की,  दिघीकरांना निवडणूकीत विकास करु अशी आश्वासने दिली, प्रत्यक्षात दिघीकरांची फसवणूक झाल्याने मतदार हतबल झाले आहेत. महापालिका उद्यान विभागाने 36 लाखांची निविदा काढली असून आता नव्याने कोणती विकासकामे होणार याविषयी चर्चा रंगली आहे. प्रत्यक्षात  उद्यान घोटाळा करणा-या संबधित आधिकारी व लिपिक कर्मचारी यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा
       –वसंत (आप्पा ) रेंगड़े दिघी
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button