breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सत्ता गेल्याने सैरभैर भाजपने राजकीय भाषणबाजीतच वेळ घालवला,- रोहित पवार

महाईन्यूज | नागपूर

विरोधी पक्षात बसलेल्या भाजपकडून अधिक प्रगल्भतेने जनतेचे प्रश्न मांडावेत, विकासावर बोलावं अशी अपेक्षा होती. पण सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेल्या भाजपने आपला वेळ राजकीय भाषणबाजीतच घातला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. रोहित पवार यांनी आज विधानसभेत आपलं पहिलं भाषण केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातलेला आहे. यावेळी त्यांनी बेरोजगारी, शिक्षण, उद्योग, शेती, महिला, तरुणांचे प्रश्न, सरकारी नोकरीतील रिक्त पदे आदी प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, वास्तविक विरोधी पक्षात बसलेल्या भाजपकडून अधिक प्रगल्भतेने जनतेचे प्रश्न मांडावेत, विकासावर बोलावं अशी अपेक्षा होती. पण सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेल्या भाजपने आपला वेळ राजकीय भाषणबाजीतच घातला आहे.

परिणामी सत्ताधारी महाआघाडीच्या मंत्र्यांनाही त्यांच्या राजकीय प्रश्नांना उत्तरं देण्यात वेळ खर्ची घालावा लागला आहे. सत्तेतील आमचा भागीदार मित्र शिवसेनेला ‘पुन्हा’ ओढण्याचा भाजपचा डाव असल्याचं अजूनही त्यांच्या बोलण्यातून जाणवतं पण त्याचा आता काही उपयोग होणार नाही. विकासाच्या गोष्टी करताना राजकीय पतंगबाजी टाळली पाहिजे असं मला वाटतं, असे पवार म्हणाले.ते म्हणाले की, बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबवण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत 3-4 हजार कोटी खर्च करुन सुरु केलेले 2200 स्किल डेव्हलपमेंट सेंटर आज बंद पडले आहेत. राज्याचा विकासदर घसरत आहे. पाच वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या काळात देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य गेल्या पाच वर्षात 13 व्या क्रमांकावर गेलं ही आपल्यासाठी निश्चितच भूषणावह गोष्ट नाही, असेही ते म्हणाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button