breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प यांच्या धोरणांना कंटाळून अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर पररराष्ट्र धोरणावरुन मतभेद झाल्यामुळे जीम मॅटिस यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियामधून अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मॅटिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तज्ञांचा सल्ला झुगारुन हा निर्णय घेतल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर चौफर टीका सुरु आहे.

सीरियामध्ये इसिसचा पाडाव झाला आहे असा ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी सीरियामध्ये दोन हजाराच्या आसपास तैनात असलेले सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर मॅटिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

जीम मॅटिस हे निवृत्त सैन्य अधिकारी आहेत. तुमच्या विचारांशी मत जुळणाऱ्या व्यक्तीला संरक्षण मंत्री पदी नियुक्त करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. या पदावरुन पायउतार होण्यासाठी माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सहकाऱ्यांना आदराने वागवण्याची माझी पद्धत आहे. असे मॅटिस यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Donald J. Trump

@realDonaldTrump

General Jim Mattis will be retiring, with distinction, at the end of February, after having served my Administration as Secretary of Defense for the past two years. During Jim’s tenure, tremendous progress has been made, especially with respect to the purchase of new fighting….

44.8K people are talking about this

जीम मॅटिस उत्कृष्ट कामगिरी पार पाडून फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत आहेत. माझ्या प्रशासनात दोन वर्ष त्यांनी संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. जीम यांच्या कार्यकाळात प्रचंड प्रगती झाली असे ट्रम्प यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button