breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

…तर महाविकास आघाडी सरकार कोसळणार- कंगना रनौत

मुंबई |

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटातील संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर करून एनआयएने 25 मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला आहे. आता या प्रकरणावरून भाजपकडून टीका केली जात असतानाच, अभिनेत्री कंगना राणावतने ट्विट करत निशाणा साधला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास ठाकरे सरकार कोसळेल, असे भाकीत कंगनाने वर्तवले आहे. कंगना ट्विट करत म्हणाली की, या प्रकरणात एक मोठं कटकारस्थान शिजत असल्याचं मला दिसत आहे. पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. मात्र शिवसेना सत्तेत आल्यानंतर परत सेवेत घेण्यात आले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1370965964381159425?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1370965964381159425%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpoliticalmaharashtra.com%2Fthen-the-thackeray-government-will-fall-kanganas-tweet-after-sachin-vaze-arrest-26480%2F

या प्रकरणाचा जर योग्य तपास केला तर केवळ या प्रकरणातील रहस्यचं बाहेर येणार नाही, तर महाविकास आघाडी सरकार देखील कोसळेल. माझ्यावर 200 पेक्षा जास्त एफआयआर दाखल होतील असं माझं मन सांगत आहे. जय हिंद, असे कंगना म्हणाली आहे. दरम्यान, सध्या सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. शनिवारी रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली होती. एनआयएकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

वाचा- ‘शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते’, निलेश राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button