breaking-newsराष्ट्रिय

‘हेच का तुमचं घर घर मोदी’, मोदी सरकारला ओवेसींचा सवाल

मोदी सरकारच्या एका निर्णयावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलीस आयुक्तांसहित देशातील 10 महत्त्वाच्या तपास यंत्रणांना कोणत्याही कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्याची मुभा दिली आहे. यामुळे तपास यंत्रणांना यापुढे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार नाही. यासंबंधी एक पत्रकदेखील जारी करण्यात आलं आहे. केंद्रीय गृह सचिव राजीव गोबा यांनी पत्रकावर स्वाक्षरी केली आहे.

याआधी तपास यंत्रणांना एखाद्या फोन क्रमांकाचे कॉल डिटेल्स किंवा इंटरनेट डेटावर नजर ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी घेणं अनिवार्य होतं. मात्र या निर्णयामुळे आता ही परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. तपास यंत्रणा कोणत्याही मोबाइल, लॅपटॉप किंवा संगणकातून माहिती मिळवू शकतात. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा असदुद्दीन ओवेसी यांनी निषेध केला आहे.

ओवेसी यांनी एक ट्विट करत टोला मारला आहे की, घर घर मोदीचा अर्थ आता आम्हाला कळला. ते म्हणाले आहेत की, ‘मोदींनी राष्ट्रीय तपास यंत्रणांना आपल्यामधील संभाषणाची हेरगिरी करण्याचा आदेश दिला आहे. कोणाला माहित होतं जेव्हा ते घर घर मोदी बोलत होते तेव्हा त्याचा अर्थ हा होता’. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने प्रचारात घर घर मोदीची घोषणा केली होती. ही घोषणा चांगलीच प्रसिद्द झाली होती.

Asaduddin Owaisi

@asadowaisi

Modi has used a simple Government Order to permit our national agencies to snoop on our communications.

Who knew that this is what they meant when they said ‘ghar ghar Modi’.

George Orwell’s Big Brother is here & welcome to 1984.

389 people are talking about this

गृहमंत्रालयाने सुरक्षेचं कारण देत 10 तपास यंत्रणा ज्यामध्ये गुप्तचर यंत्रणा, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, अंमलबजावणी संचलनालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्त टॅक्सेस, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, सेंट्रल ब्युरो ऑफ इंटेलिजन्स, कॅबिनेट सेक्रेटेरिएट, डायरेक्टरेट ऑफ सिग्नल इंटेलिजेन्स, दिल्ली पोलीस आयुक्तालय यांना अधिकार दिला आहे.

तपास यंत्रणांना आयटी अॅक्टच्या कलम-69 अतंर्गत हा अधिकार देण्यात आला आहे. यानुसार जर तपास यंत्रणांना एखादी संस्था किंवा व्यक्ती देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आला तर त्याच्या मोबाइल, संगणकाची चौकशी केला जाऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button