breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर जातीयवाद करतायत; जोगेंद्र कवाडे यांचा आरोप

अहमदनगर, (महा-ई-न्यूज) – ‘जातीयवाद टाळण्यासाठी उपाय सुचवणारे प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख केल्याने राजकीय क्षेत्रात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर जातीयवाद करत असल्याची जोरदार टीका केली आहे.

‘जातीअंताचे आंदोलन भारिप बहुजन महासंघ करत आहे. मग या आंदोलनाला दफन करून पुन्हा जातीयवाद पेरण्याचं काम त्यांनी का करावं? जातीय प्रथा बळकट करण्याचा नवीन प्रयोग करण्याचा अट्टाहास प्रकाश आंबेडकरांनी टाळला पाहिजे,’ असा सल्ला कवाडे यांनी दिला आहे. जोगेंद्र कवाडे यांनी काही गोष्टींवरून आंबेडकर यांना सुनावताना त्यांना एक ऑफरही दिली आहे. ‘रामदास आठवले हे धर्मनिरपेक्ष नव्हते. ते भाजपमध्ये होते. त्यांना डिलिट करून टाका. बहुजन वंचित आघाडी ही महाआघाडीत विलीन करून प्रकाश आंबेडकरांनी या महाआघाडीचे नेतृत्व करावं,’ असं आवाहन जोगेंद्र कवाडे यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून नुकतीच 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना उमेदवारांच्या नावापुढे जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरूनच कवाडेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button