breaking-newsराष्ट्रिय

समुद्रात अडकलेले नाफ्ता जहाज अखेर मुरगाव बंदरात दाखल

महाईन्यूज | गोवा

गेले 48 दिवस दोनापावल येथील समुद्रातील खडकांमध्ये रुतून बसल्यानंतर “नू शी नलिनी” हे नाफ्तावाहू जहाज हटविण्यात अखेर हॉलंडच्या कंत्रटदार कंपनीला बुधवारी रात्री उशिरा यश आले. हे जहाज मुरगाव बंदरातील आठ क्रमांकाच्या धक्क्यावर नांगरून ठेवले गेले आहे.नाफ्तावाहू जहाजाला मुरगाव बंदराने गोव्याच्या समुद्रात येण्यास परवानगी दिल्याने मुरगाव पोर्ट ट्रस्टवर आणि गोवा सरकारवरही लोकांकडून मोठी टीका सुरू केली होती. केरळमधील बंदराकडून या जहाजाला परवानगी नाकारली गेली होती.

मात्र गोव्यात कोणताच उद्योग नाफ्त्याचा वापर करत नाही पण तरीही गोव्याच्या सागरी हद्दीत येण्यास या जहाजाला परवानगी दिली गेल्याने गोवा सरकारचीही विरोधकांनी कोंडी केली होती. काही मंत्र्यांवरही या प्रकरणी आरोप झाले होते. नू शी नलिनी जहाजाचे इंजिन बंद पडलेले आहे. हे जहाज ओढतच गोव्याच्या समुद्रात आणले गेले होते.दोनापावल येथील गोवा राजभवनच्या मागे मोठा समुद्र आहे, त्या समुद्रातील खडकांमध्ये 48 दिवसांपूर्वी हे जहाज अडकले होते. जहाज हटविण्याचे मुरगाव बंदराचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर डीजी शिपिंग यंत्रणोने जागतिक निविदा जारी केली व हॉलंडच्या तज्ज्ञ कंपनीस कंत्रट दिले. जहाज हटविणे आणि त्यातील नाफ्ताही काढणे या कामासाठी एकूण तिस कोटी रुपयांना निविदा दिली गेली. एक महिन्याची मुदत कंत्राटदार कंपनीस दिली गेली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button