breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टेन्शन नको, पेन्शन पाहिजे

अंगणवाडी सेविकांच्या निदर्शनात घुमला आवाज

पिंपरी | प्रतिनिधी

अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्रच्या वतीने पिंपरीतील अशोक थिएटर जवळील एकात्मिक बालविकास सेवा योजना, पिंपरी चिंचवड १ व विजय नगर येथील पिंपरी 2 येथे जोरदार धरणे निदर्शने केली. तसेच नुकताच बदायूं, उत्तर प्रदेश येथे जेष्ठ अंगणवाडी मंदिरातील पुजारी व साथीदारांनी अनन्वित अत्याचार करून निर्घृण खून केला. अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करा व अंगणवाडी ताईंच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा.  भंडारा बालक होरपळीला जबाबदार असणाऱ्यांना शासन करा, आदी मागण्या करण्यात आल्या.

म्हातारपणाचा आधार बनण्यासाठी सध्या निवृत्ती नंतर अंगणवाडी सेविकेला 1 लाख व मदतनिसला फक्त 75 हजाराचा निवृत्ती नंतरचा एकदाच मिळणारा लाभ पुरेसा नाही. बहुसंख्य एकल स्त्रिया असणाऱ्या अंगणवाडी सेविकेला मासिक पेन्शनची गरज आहे. या मागणीसाठी अंगणवाडी कृती समितीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात रोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रामुख्याने खालील मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय करण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य कृती समितीने हा निर्णय घेतला. त्यानुसार हे आंदोलन घेण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो अंगणवाडी ताई सहभागी झाल्या होत्या. यावेळी जादा कामाचे  टेन्शन नको-म्हातारपणाची पेन्शन हवी, मानधन नको दयेचे-वेतन हवे हक्काचे, अंगणवाडी ताई देशाच्या मानवी विकास दूत या घोषणा दिल्या जात होत्या व त्याचे घोषणा फलक प्रदर्शित करण्यात आले होते. या आंदोलनात शैलजा चौधरी, रीना कानडे, अनिता कलावती, कल्याणी दुर्गा रवींद्र, मोनाली चंद्रशेखर अपर्णा , काशीनाथ शेलार, बापू कांबळे इ.विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

2 ऑक्टोबर १९७५ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुरू झाली. २०२०मध्ये या योजनेला ४५ वर्ष पूर्ण झाली. अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आपल्या रक्ताचे पाणी करून लाभार्थ्यांना सेवा दिली. या योजनेच्या पायाचा दगड झालेल्या अंगणवाडी ताई कोणत्याही लाभाशिवायच ६५ वयानंतर रिकाम्या हाताने घरी गेल्या. २००३पासून सातत्याने लढा दिला.त्यानंतर निवृत्तीनंतरचे एकरकमी लाभ मिळाले. त्याविषयीचा शासनादेश निघण्याच्या आधी निवृत्त झालेल्या अंगणवाडी ताईनाही मिळाले  पाहिजेत ही मागणीही यावेळी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

समितीच्या वतीने केलेल्या मागण्या –

१. गेल्या २,३ वर्षांपासून निवृत्त झालेल्या किंवा मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकित  सेवा समाप्ती लाभ त्वरित अदा करण्यात यावा.

२. एकरकमी सेवा समाप्ती लाभ कायम ठेवून त्या व्यतिरिक्त सेविका मदतनिसांना त्यांच्या शेवटच्या मानधनाच्या निम्मी रक्कम मासिक पेन्शन स्वरूपात तहहयात देण्यात यावी.

३. भविष्यात कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाल्यास पेन्शनमध्ये त्या वाढीच्या निम्या रकमेची वाढ करण्यात यावी.

4.प्रकल्पाच्या पाया झालेल्या मात्र शासन आदेशात कालावधी निश्चित केल्याने निवृत्तीनंतरचे लाभ न मिळालेल्या अंगणवाडी ताईंनाही निवृत्तीनंतरचे लाभ द्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button