breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

तरुणीवर धावत्या बसमध्ये दोन वेळा अत्याचार

नागपुरहून पुण्याला येताना घडली घटना

धावत्या बसमधून फेकण्याची दिली होती धमकी

पिंपरी | प्रतिनिधी

नागपूरवरून पुण्याला येणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर खासगी बसमध्ये दोन वेळा अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ६ जानेवारीला रात्री प्रवासादरम्यान ही घटना घडली. चाकूचा धाक दाखवून क्लिनरकडून तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्याचबरोबर अत्याचारा बाबत कोणाला काही बोलल्यास चालत्या बसमधून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली होती. महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना ही आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. पीडितेनं पुण्याजवळील रांजणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जानेवारी रोजी पीडित तरुणी नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. तरुणी खासगी बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये चढल्यानंतर तिला बराच वेळ सीट मिळाले नाही. काही वेळानंतर तिला क्लिनरने बसच्या पाठीमागच्या सीटवर बसण्यास सांगितले. बस सुरू झाल्यानंतर क्लिअनरने तिला चाकूचा धाक दाखवला आणि दोन वेळा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या घटनेबद्दल वाच्यता केल्यास चालत्या बसमधून फेकून देण्याची धमकीही दिली.

बस पुण्यात दाखल झाल्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित तरुणी मूळची गोंदिया जिल्ह्यातील असून, ती पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. खासगी बस वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात असताना ही घटना घडलेली असल्यानं गुन्हा मालेगाव पोलिसांकडे वर्ग केला. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी फरार आहे. ज्या बसमध्ये ही अत्याचाराची घटना घडली, ती बस मालेगाव पोलिसांनी पुण्यातून जप्त केली आहे. त्याचबरोबर आरोपी क्लिनरला अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक नागपूरला पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, पीडित तरुणीला वैद्यकीय चाचणीनंतर घरी पाठवण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button