breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे पोलीस भरतीची लेखी परीक्षा 5 ऑक्टोबरला – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे – पुणे पोलीस दलात रिक्त असलेल्या 214 पोलीस शिपाई पदाच्या जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरतीची लेखी परीक्षा 5 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी होणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, “पुणे शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 214 पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती घेतली जात आहे. या भरतीची सन 2019 मध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्याची लेखी परीक्षा 5 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी अकरा ते साडेबारा या कालावधीत होणार आहे.

लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र 22 सप्टेंबर पासून त्यांच्या ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हे प्रवेशपत्र https://mahapolicerc.mahaitexam.in या पोर्टलवरून देखील प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील.

उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित राहावे. उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करताना काही अडचण आल्यास 9699792230 / 8999783728 / 9309868270 या क्रमांकावर पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्ष 020 – 26122880 / 020 – 26126296 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पुणे पोलीस भरतीची जाहिरात येऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जात आहे. भरतीसाठी पहिला टप्पा 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी अगोदर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. थर्ड पार्टीकडून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यावर पोलिसांचे नियंत्रण असेल, असेही आयुक्त म्हणाले.

खाली दिलेल्या तीन पद्धतीने हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल –

# उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेलवर हॉल तिकीट डाऊनलोड लिंक पाठवली जाईल. हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

# https://mahapolicerc.mahaitexam.in/Phaseone या लिंकवर क्लिक करून युझरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन मधून हॉल तिकीट डाऊनलोड करा.

# https://mahapolicerc.mahaitexam.in/Phaseone या लिंकवरील ‘डाऊनलोड हॉल तिकीट’ या बटनावर क्लिक करून ऍडमिटकार्ड डाऊनलोड करण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन आयडी / आधार कार्ड नंबर / ईमेल आयडी आणि जन्म तारीख अर्जात भरल्याप्रमाणे प्रविष्ट करून हॉल तिकीट डाऊनलोड करा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button