breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टाटा मोटर्सच्या ‘नेक्सॉन इव्ही’ कारचे इंद्रायणी थडीमध्ये ‘लाँचिंग’

  • उद्योगनगरी जपण्यासाठी ‘टाटा’चा व्यवसाय वाढला पाहिजे: सचिन लांडगे
  • ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या विविध कार्स पाहण्यासाठी जत्रेत नागरिकांची गर्दी

पिंपरी । प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्वांत मोठी आणि लक्षवेधी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ मध्ये टाटा मोटर्स कंपनीकडून विविध ‘व्हेईकल्स’ बूकिंग व प्रमोशनसाठी ठेवण्यात आल्या. विशेष म्हणजे, कंपनी व्यवस्थापनाने ‘नेक्सॉन इव्ही’ या कारचे ‘लाँचिंग’ माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरीतील गावजत्रा मैदानावर इंद्रायणी थडी जत्रा भरविण्यात आली आहे. शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने आयोजित केलेली जत्रा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर ‘औद्योगिकनगरी’ किंवा कामगार नगरी म्हणून ओळखली जाते. ॲटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रकल्प शहरात आहेत. टाटा मोटर्स ही त्यापैकी आघाडीची कंपनी आहे. भोसरी आणि परिसरात टाटा परिवारात काम करणारे सुमारे ६ हजार ५०० कामगार आहेत. टाटा मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन लांडगे हे आमदार लांडगे यांची लहान बंधू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या जत्रेत ‘टाटा’च्या उत्पादनांचे सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा कामगारांची होती. कंपनी व्यवस्थापनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेत इंद्रायणी थडीमध्ये स्टॉल आणि प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला.

टाटा कंपनीचे मार्केटींग हेड जयवंत घोडके म्हणाले की, इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून कंपनीची उत्पादने आणि प्रमोशन ॲक्टिव्हीटी करण्याबाबत पुढकार घेतला आहे. यामध्ये नेक्सॉन इव्ही, अल्ट्रॉझ, फॅसिलिफ्ट, टियागो, टिगोर, नेक्सॉन, हॅरिअर आदी वाहने प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. कंपनीच्या वतीने दोन दिवसांत दीड लाख पॅम्प्लेट वाटप केले आहे. याठिकाणी तयार केलेल्या सेल्फी पाईंटवर सुमारे ५० हजार जणांनी सेल्फी घेतल्या आहेत. रेड, ब्लू, गोल्ड आणि यलो आदी रंगातील दिमाखदार गाड्या जत्रेत आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.


  • ‘टाटा’च्या स्टॉलवर तरुणांची गर्दी : सचिन लांडगे

कामगार नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये ‘टाटा मोटर्स’मध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. भोसरी परिसरात सुमारे साडेसहा हजार कामगार ‘टाटा’शी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या ‘इंद्रायणी थडी’ जत्रेमध्ये कंपनीच्या उत्पादनांचा स्टॉल असावा, अशी बहुसंख्य कामगारांची अपेक्षा होती. आपल्या जत्रेत आपल्या कंपनीचा स्टॉल…ही आपुलकीची भावना असल्याने प्रत्येकाला कंपनीच्या स्टॉलबाबत उत्सुकता होती. उद्योजकता प्रोत्साहन आणि महिला उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी. या हेतूने सुरू केलेली ही जत्रा ‘टाटा’च्या स्टॉलमुळे राज्यभरात पोहोचली. तसेच, उद्योगनगरी जपायची असेल, तर टाटा मोटर्सच्या उत्पादनात आणि विक्रीमध्ये वाढ झाली पाहिजे, असे मत टाटा मोटर्स युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button