breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अफवांविरोधात मोहीम

सायबर पोलिसांचा समाजमाध्यमांवरून प्रभावी संदेश

मुंबई : अफवा पसरवणे हा गुन्हा असून तो सिद्ध झाल्यास शिक्षा होऊ शकते. अफवा एखाद्याचा जीव घेऊ शकते, तर पूर्ण समाजाला वेठीस धरू शकते, ही जाणीव अद्याप सर्वसामान्य जनतेला नाही. त्यामुळेच समाजमाध्यमांवर आलेला मजकूर खातरजमा न करताच जशास तसा पुढे पाठवला जातो. सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडलेली ही सवय लक्षात घेत महाराष्ट्र सायबर विभागाने सर्व आघाडय़ांवर अफवांविरोधी मोहीम हाती घेतली आहे.

धुळे प्रकरणानंतर वेगाने हालचाल करत महाराष्ट्र सायबर विभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाशी समन्वय ठेवून समाजमाध्यमांवरून आलेल्या प्रत्येक माहितीची खात्री करा, खात्री केल्याशिवाय ती पुढे पाठवू नका, अफवा पसरवू नका, हा गुन्हा आहे, अफवेमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, या संदेशाचा प्रभावी मारा सुरू केला. राज्यातील प्रत्येक पोलीस गटाचे ट्विटर हॅण्डल आहे. मुंबईसह राज्य पोलीस दलातील ट्विटर हॅण्डलचे एकूण ७० लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. राज्यातील ४७ सायबर लॅबमधील अधिकाऱ्यांनी आपापल्यापरीने अफवांबाबत जनजागृती करणारी भित्तिपत्र, बॅनर तयार केले. ते पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरून लगोलग सर्वदूर पसरवण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एक कोटींहून अधिक मोबाइलधारकांना अफवा पसरवू नका, असे लघुसंदेश धाडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button