breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘छत्रपती शिवराय, आई-वडिलांची शपथ घेणं गुन्हा असेल तर तो मी करेन’ –

मुंबई |महाईन्यूज|

छत्रपती शिवराय हे आमचं दैवत, त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतोय. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. दरम्यान, ‘सभागृहाने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी आभार मानतो. पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी इथे आहे. असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने शनिवारी अखेर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. जयंत पाटील, नवाब मलिक आणि सुनील प्रभू यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर शिरगणती घेण्यात आली. त्यात विश्वासदर्शक ठरावांच्या बाजूने 169 मतदान झाले. तर भाजपने विश्वासदर्शक ठरावापूर्वीच सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शुन्य मतदान झाले. तर 4 आमदार तटस्थ राहिले. चार तटस्थ आमदारांमध्ये एमआयएमचे दोन, सीपीआय(एम) एक आणि मनसेच्या एका आमदारांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button