breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलिसांच्या तावडीतून निसटलेला रावण टोळीचा सदस्य सोन्या अखेर जेरबंद

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आणि पोलिसांच्या तावडितून फरार झालेला रावण साम्राज्य टोळीच्या सदस्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्यावर दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई चिंचवड स्टेशन येथे करण्यात आली.

अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (वय 26, रा. जाधव वस्ती, रावेत) असे अटक आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसांपूर्वी आरोपी अविनाश आणि त्याचे सहा साथीदार वाकड येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून दरोड्यातील सहाजणांना अटक केली होती. मात्र, अविनाश उर्फ सोन्या पोलिसांच्या तावडीतून निसटून फरार झाला होता.

पोलीस नाईक सावन राठोड यांना माहिती मिळाली की, आरोपी अविनाश जाधव चिंचवड स्टेशन येथील मल्हार पान दुकानासमोर थांबला आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी परिसरात सापळा रचून अविनाश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो वाकड येथील पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे सांगितले.

2016 साली रावेत येथील हॉटेल झूमइन येथे आरोपी अविनाश आणि त्याचे रावण साम्राज्य टोळीतील दहा साथीदार यांचे हॉटेलचे बिल भरण्यावरून भांडण झाले. त्यातून त्यांनी हॉटेल मध्ये दरोडा टाकला होता. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर 2017 साली रावण साम्राज्य टोळीतील 12 जणांनी मिळून वाल्हेकरवाडी मधील व्यावसायिक पप्पू आरसूळ यास जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. त्यामध्ये नवले नावाची व्यक्तीमध्ये आली आणि आरोपींच्या हल्ल्यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली.

याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नचा गुन्हा दाखल आहेत. त्याचबरोबर 2017 मध्ये खडकी येथे आरोपी अविनाश याने त्याच्या सहा साथीदारांबरोबर मिळून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा डाव देखील उधळून लावत त्यांच्याकडून सहा कोयते, एक पिस्तूल आणि एक कार असा ऐवज जप्त केला. याबाबत खडकी पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपी अविनाश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button