breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीतील ‘इंद्रायणी थडी’मध्ये ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’चे दर्शन

  • आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमाला सर्वपक्षीयांची हजेरी
  • महाराष्ट्राची संस्कृती, अन्‌ महिला सन्मान जपणाऱ्या जत्रेला मान्यवरांची पसंती

पिंपरी । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भरविण्यात आलेल्या ‘इंद्रायणी थडी’ जत्रेला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. राजकीय मतभेद आणि चौकट बाजूला ठेवून ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ अशी भूमिका घेत राजकारण विरहीत सांस्कृतीक उपक्रमाला दिग्गजांनी दाद दिली.

आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भोसरीतील गावजत्रा मैदानावर भरविण्यात आली आहे. चार दिवस सुरू असलेल्या या जत्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

विशेष म्हणजे, भाजप शहराध्यक्ष असलेल्या महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भरवलेल्या जत्रेला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप आदी विविध पक्षांतील स्थानिक नेत्यांनी हजेरी लावली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादीचे नगरसेवक भाउसाहेब भोईर, राजू मिसाळ, अजित गव्‍हाणे, संजय वाबळे, शिवसेना संघटिका सुलभा उबाळे, रिपाइंच्या चंद्रकांत सोनकांबळे आदी विविध पदाधिकाऱ्यांनी जत्रेत सहभाग घेतला.


  • अजित गव्‍हाणे यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या…

राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्‍हाणे यांनीही इंद्रायणी थडी जत्रेला आवर्जून उपस्थिती दर्शवली. आमदार महेश लांडगे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार विलास लांडे यांचे विश्वासू म्हणून अजित गव्‍हाणे यांची ओळख आहे. मात्र, तरीही राजकीय मतभेद बाजूला ठेवून अजित गव्‍हाने इंद्रायणी थडीला उपस्थित राहीले. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तत्पूर्वी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि लांडगे यांच्यामध्येही राजकीय रस्सीखेच होती. पण, आढळराव पाटील यांनीही इंद्रायणी थडीतील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. एकेकाळी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असलेल्या सुलभा उबाळे याही उपस्थित राहिल्या. त्यामुळे भोसरी मतदार संघामध्ये ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ हा विचार रुजताना दिसत आहे, ही बाब स्वागतार्ह मानली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button