breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनाविषयी मोहोळच्या पोलिसाने कवितेच्या माध्यमातून केली जनजागृती

सोलापूर – कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि कशी काळजी घ्यावी याबाबत कवितेच्या माध्यमातून एका पोलिसाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक अभिजित गाटे यांनी कोरोनाबाबत “माणूस आहात माणसासारखं रहाना कारण आलाय आता कोरोना…” ही कविता तयार केली आहे. त्यांनी या कवितेच्या माध्यमातून जनतेचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या कवितेला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

अभिजीत गाटे यांनी कोरोनासंदर्भात तयार केलेल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी माणसाने माणसासारखे वागा, आपापसातील वाद, विवाद, अहंकार, रुसवे, फुगवे सोडून मोठ्या मनाने एकमेकांना माफ करा असा संदेश दिला आहे. तसंच कोरोना आला आहे त्यामुळे शहरी भागात कामाला गेला असला तरी आई-वडिलांना विसरु नका, सगळी मंदिरे बंद झाली तरी दवाखाना, पोलिस ठाणे ही दोन मंदिरे सुरु आहेत. त्यातील सेवक, डॉक्टर, पोलिस अधिकारी, कर्मचारी, नेहमी तुमच्या सेवेसाठीच अहोरात्र झटत आहेत जरा त्यांचाही विचार करा, अशा सूचना कवितेच्या माध्यमातून त्यांनी दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button