breaking-newsपुणे

ज्येष्ठ महिलेची फसवणूक; रांका ज्वेलर्सच्या मालकासह बिल्डरा विरोधात गुन्हा दाखल

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिध्द सराफी पेठी रांका ज्वेलर्सचे(कर्वे रस्ता) मालक ओमप्रकाश नागराज रांका, वास्तुपाल ओमप्रकाश रांका यांच्यासह बांधकाम व्यवसायीक रितेश विजयकुमार मेहता, अंकुश विजयकुमार मेहता यांच्या विरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी जयश्री अजित दरेकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार आरोपींनी पर्वती शिवारातील वडिलोपर्जीत मालमत्तेवर झोपडपट्टी विकास प्राधिकरण योजनेअंतर्गत 2002 मध्ये करण्यात आलेल्या करारपत्रकात नमूद केल्याप्रमाणे जमिनीच्या मालकी हक्‍काच्या मोबदल्यात फिर्यादी यांना देऊ करण्यात आलेली सदनिका, कार्यालय आणी टीडीआर देण्याचे नाकारले. बनावट दस्ताव्दारे वेळोवेळी जमिन खरेदी विक्रीचे अधिकार अदान प्रदान करुन फसवणूक फसवणूक केली आहे. आरोपींनी फिर्यादीला बाराशे चौरस फुटाची एक सदनिका 1500 चौरस फुटाचे कार्यालय आणी 10 हजार चौरस फुटाचा टीडीआर देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button