breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

संत्र असतं ‘एवढं’ गुणकारी…जाणून घ्या संत्र खाण्याचे अनेक फायदे…

संत्र्याचा वापर किंवा संत्र्याच्या सालीचा वापर नितळ चेह-यासाठी केला जातो हे तसं सर्वांनाच माहित आहे. त्वचेसाठी संत्री जितकी चांगली आहेत तितकीच ती शरीरासाठीही गुणकारी आहे. संत्र्यामधलं व्हिट्यामिन C हे जस सुंदर त्वचेसाठी उपयुक्त ठरत तसंच ते शरीरासाठीही उत्तम असतं…त्यात हिवाळा हा संत्र्यांचा हंगाम असल्याने फळांच्या हंगामाप्रमाणे ते ते फळं खाण्याचेही अनेक फायदे आहेत…

तर, जाणून घेऊयात संत्र्यांचे 5 महत्त्वाचे फायदे

1. थंडीत नियमितपणे संत्र खाणं आपल्याला निरोगी ठेवतं.त्यामुळे त्वचेवर आर्द्रता आणि ओलावा राहतो.

2. संत्र्यातील गुणधर्मामुळे किडनी स्टोन होण्याचं प्रमाण कमी होतं,असंही एक निरीक्षण आहे.

3. आपले दात आणि शरीरातली हाडं बळकट ठेवण्यासाठी त्यातलं कॅल्शियम मदत करते.

4. संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा (फायबरचा)चांगला उपयोग होतो.

5. त्यातल्या व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची शक्यता कमी होते.तसेच कॅन्सर आणि ह्रदयरोगाला लांब ठेवते.

संत्र्यांचा सुवास हा खूप चांगला असल्याने त्याचा वापर अत्तरांमध्येही केला जातो. त्यामुळे थोडक्यात आंबट म्हणून संत्र्याकडे पाठ फिरवणा-यांनी संत्रे खाणे सुरु केलं तर शरीराला त्याचा नक्कीच फायदा होईल…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button