breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भोसरीत आजी-माजी आमदारांपेक्षा माजी विरोधी पक्षनेता सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांची 2 कोटी 44 लाख रुपयांची संपत्ती आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांची 24 कोटी 17 लाख 96 हजार एवढी संपत्ती जाहीर केली आहे. तर, पिंपरी-चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्षनेता दत्ता साने यांची 36 कोटी 86 लाख एवढी संपत्ती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांपेक्षा विरोधी पक्षनेता राहिलेल्या दत्ता काका साने यांची संपत्ती सर्वाधिक आहे.

माजी आमदार विलास लांडे यांची संपत्ती

लांडे यांच्याकडे 24 कोटी 17 लाख 96 हजार रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे विविध ठिकाणी शेतजमीन आणि बिगरशेती जमीन आहे. त्यांच्याकडे एकही मोटार नाही. लांडे यांनी शेती आणि व्यवसाय हे आपले उत्पन्नाचे स्रोत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सात लाखांचे गृहकर्ज घेतले आहे. तसेच, त्यांनी एलआयसीमध्ये 80 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. दहा विविध बॅंकांमध्ये 11 लाख 55 हजार रुपयांच्या ठेवी असून, पाच कोटी 76 लाखांचे शेअर्स आहेत. त्यांच्याकडे 23 लाख 4 हजार रुपये किमतीचे 600 ग्रॅम सोने आहे. 1 कोटी 42 लाखांची शेतजमीन असून, 68 लाखांची गुंतवणूक निवासी इमारतीमध्ये केली आहे. 


आमदार महेश लांडगे यांची संपत्ती 

लांडगे यांच्याकडे दोन कोटी 44 लाखांची मालमत्ता आहे. त्यापैकी 36 लाख 31 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर दोन कोटी 7 लाख 64 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे 9 तोळे सोने आहे. 57 हजार रुपये किमतीचे रिव्हॉल्वर आहे. लांडगे यांनी वेतन आणि कॅब आणि बस सर्व्हिसचा व्यवसाय, हे आपले उत्पन्नाचे स्रोत असल्याचे दाखविले आहे. विविध बॅंकांमध्ये 31 लाख 63 हजार 883 रुपयांच्या ठेवी आहेत. तर, 60 हजार 500 रुपयांचे शेअर्स आहेत. निवासी इमारतीची 43 लाख 70 हजार रुपयांची किंमत आहे. लांडगे यांची खेड तालुक्‍यातील पिंपळगाव येथे शेतजमीन आहे. त्याची किंमत 77 लाख 85 हजार 273 रुपये आहे. तर, गाव मौजे चऱ्होली या ठिकाणी बिगरशेती जमीन आहे. त्याची बाजारभावाप्रमाणे 83 लाख 9 हजार 229 रुपये किंमत आहे.

दत्ता साने यांची सर्वाधिक संपत्ती

दत्ता साने यांचे शिक्षण इयत्ता दहावी झाले आहेत. 36 कोटी 86 लाख एवढी त्यांची स्थावर मालमत्ता आहे. 79 लाख रुपयांची जंगम मालमत्ता, त्यांच्यावर 23 लाख 86 हजार रुपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्र बँक, पीडीसी बँक आणि एचडीएफसी बँकेत त्यांच्या 4 लाखांच्या ठेवी आहेत. ऑडी क्यू नंबर 5, महिंद्र जीप, हुंदाई 10, इनोव्हा, टाटा इस्टेट, दोन दुचाकी अशी वाहने आहेत. तर, 37 हजार रुपयांचे एक रिव्हॉल्व्हर देखील त्यांच्याकडे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button