breaking-newsपिंपरी / चिंचवड

ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त मंडळाचे विश्वस्त प्रभाकर शास्त्री यांची आत्महत्या

आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त मंडळाचे विश्वस्त प्रभाकर महाराज शास्त्री यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर महाराज ट्रस्टचे विश्वस्त प्रभाकर शास्त्री महाराज यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी आठच्या सुमारास घरच्या मंडळींनी त्यांच्या खोलीमध्ये पाहिले असता खोलीतील पंख्याला त्यांचा मृतदेह लटकलेला आढळून आला. घरच्यांनी मृतदेह खाली उतरवला. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button