breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणीनगरमध्ये रक्तदान शिबीर

  • भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पुढाकार
  • आमराई चॅरिटेबल ट्रस्ट, शिवगर्जना प्रतिष्ठाणसह भाजपा कार्यकर्त्यांचा सहभाग

पिंपरी । प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणीनगर येथे उद्या (दि.२५ जुलै) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम होणार आहे.

भारतीय जनता पार्टी, प्रदेश कार्यालयाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुमारे १२५ हून अधिक विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

याबाबत शिवराज लांडगे म्हणाले की, भाजपा पक्षश्रेष्ठींच्या सुचनेनुसार आम्ही रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. ‘नातं माणुसकीच, रक्ताच्या नात्या पलीकडचं’ असे ब्रिदवाक्य घेवून हे शिबीर होईल. ‘आम्ही रक्तदान करतोय तुम्हीपण करा’ असे आवाहन आम्ही नागरिकांना केले आहे. कोरोना काळात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवला होता. आता कोरोनाची तिसरी लाट येणार, अशी भिती व्यक्त केली जात आहे. कोरोनासह अन्य आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना मदत व्हावी. या हेतुने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button