breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझे नाव संघाशी जोडण्या-यांवर खटले दाखल करणार : अण्णा हजारे

अहमदनगर : सातत्याने होणारी बदनामी किंवा अपमान पचविल्यामुळे जर समाजाचे, राज्याचे व देशाचे नुकसान होणार असेल तर असा अपमान पचविणे दोष ठरेल, अशी माझी धारणा आहे. खटाशी खट, धटाशी धट व उद्धटाशी उद्धट झालेच पाहिजे, अशा संत पंक्तींचा हवाला देत समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय संघाशी जाणीवपूर्वक आपले नाव जोडून बदनामीचा प्रयत्न सध्या माध्यमांमधून सुरू आहे. अशी बदनामी करणा-यांविरूद्ध न्यायालयात बदनामीचे खटले दाखल करणार असल्याचा इशारा गुरूवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.

यात अण्णा म्हणतात, दिल्ली येथील आंदोलनात सहभागी कल्पना इनामदार या नथूराम गोडसे यांची नात असल्याच्या व त्यांच्याहाती या आंदोलनाची सर्व सूत्रे अण्णांनी सोपविल्याच्या बातम्या येत आहेत. वास्तविक त्यांचा व माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलनासाठी विविध राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी इनामदार एक होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाची कोणतीही सूत्रे सोपविलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी आंदोलनाची कामे विभागून घेतली. त्यानुसार इनामदार यांनी मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती. आंदोलनाची सर्व सूत्रे मी स्वत: हाताळीत होतो. इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. किती खोटे बोलावे याचे सुद्धा बदनामी करणा-या चौकडीला भानच राहिलेले नाही.

विशिष्ट वर्गाकडून माझे नाव संघाशी जोडण्याचा प्रयत्न करून काही मंडळी मला व आंदोलनास जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे रॅकेट चालवित आहेत. गेली २५ वर्षे राष्ट्रहितासाठी कोणत्याही पक्षाचा, व्यक्तीचा विचार न करता मी आंदोलने करीत आलो. आमच्या आंदोलनामुळे विविध पक्षांच्या मंत्र्यांना घरी जावे लागले. त्यामुळे त्या त्या पक्षांची मोठा हानी झाली. पण स्वत: भ्रष्ट असल्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत. आंदोलनामुळे राजकीय पक्षांची ‘धरले तर चावते अन् सोडले तर पळते’ अशी अवस्था झाली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button