breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एमआयडीसीच्या भूखंडावर धनधगड्यांचे अतिक्रमण – बाबा कांबळे

चिंचवड एमआयडिसी कार्यालयासमोर कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने आंदोलन

पिंपरी | प्रतिनिधी

बळकवलेल्या भूखंडावर कारवाई बाबत वरिष्ठ पातळीवरून  नेहमी विचारणा होत आहे.  त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश भोसरी एमआयडीसी कार्यालयात प्राप्त झाले आहेत. परंतु संबंधित अधिकारी कारवाईचा फार्स  दाखवण्यासाठी टपरी, हातगाडी धारकांवर कारवाई करत आहे. धनदांडग्या आणि भूखंड माफियांना मात्र अभय देत आहे. ते शासनाची आणि जनतेची दिशाभूल करत आहेत. एमआयडीसीमधील भूखंडाचे श्रीखंड कोणाच्या घशात गेले, याबाबतची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली.

हातगाडी, टपरीधारक यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. चिंचवड येथील एमआयडीसी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अनिता सावळे, रमेश शिंदे, अनिल गाडे, बळीराम काकडे, बाळासाहेब ढवळे, विजय डांगरे, धनंजय कुदळे, केशव शिंदे, संतोष मस्के, संजय दौंडकर, अजय कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.

भोसरी, चिंचवड, पिंपरी येथील एमआयडीसीच्या जागेवर धनधगड्यांनी अतिक्रमण केले आहे. राजकीय व्यक्ती, एमआयडीसीचे संबंधित अधिकारी यांचे नातेवाईक यांनी एमआयडीसी मधील महत्वाच्या भूखंडावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पत्राशेड मारले आहे. सदर जागा भाड्याने देऊन प्रत्येक महिना एक लाख रुपये भाडे घेत आहेत. तसेच नेहरूनगर येथे एक ठिकानी मंदिर आणि मंगल कार्यालय बांधून सदर मंगल कार्यालय भाड्याने दिले जात आहे. यातून लाखो रुपये कमावले जात आहे. या रकमेपैकी काही रक्कम एमआयडीसी अधिकारी यांना दिले जात आहे. एमआयडीसी अधिकाऱ्याच्या संममताने राजकीय व्यक्ती भूखंड माफिया हे बेकायदेशीर कामे करून संपत्ती जमवत असल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला. पुढील काळात गोरगरीब टपरी, हातगाडी धारकांना लक्ष करून त्यांच्यावर कारवाई केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button