breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

जुळ्या बाळांच्या जन्माची कहाणी, एकाचा जन्म लोकलमध्ये दुसऱ्याचा स्टेशनवरील प्रतीक्षालयात

सफाळे देऊळपाडा येथील रहिवासी छाया सवरा या वीस वर्षीय महिलेने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विरार-डहाणू लोकलमध्ये एका बाळाला जन्म दिला. तर पालघर रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात तिच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. आश्चर्याची बाब म्हणजे पालघर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चक्क रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षालयात त्यांनी ही प्रसूती केली.पालघरमध्ये घडलेली बहुदा ही पहिलीच घटना असावी. दोन्ही बाळ व माता यांची प्रकृती आता चांगली असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली आहे.

छाया यांना सकाळच्या सुमारास प्रसूतीच्या वेदना जाणवल्याने तिच्या पतीने तिला सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र प्रसूतीमध्ये अडचणी येणार असल्याने तिला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास तेथिल डॉक्टरांनी सांगितले. वेळ कमी असल्यामुळे तिचा पती अंकुश व सासू कमली यांनी तिला रेल्वेने नेण्याचा निर्णय केला. सकाळीच नऊच्या सुमारास विरार-डहाणू लोकलमध्ये छाया हिला बसवून पालघर येथे नेत असताना पालघर स्थानकानजीक तिच्या प्रसूतीच्या कळा वाढल्या त्यातच लोकलमध्ये तिने यातील एका बाळाला जन्म दिला या घटनेची माहिती पालघर रेल्वे स्थानकाच्या कार्यालयास देण्यात आली.त्यानुसार स्टेशन मास्तरांपासून ते लोहमार्ग पोलीस,स्थानक सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जण कामाला लागले. रेल्वे स्थाकावर पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. दुसरीकडे सफाई कर्मचारी यांनी प्रसूतीची गरज लक्षात घेता संपूर्ण प्रतिक्षालाय स्वच्छ केले तर पोलिसांनी यात आपली चोख भूमिका बजावली.रेल्वे प्रवशांची मदतही यावेळी महत्वाची ठरली.

लोकल पालघर स्थाकात सुमारे 20 मिनिटे थांबवून ठेवण्यात आली.छाया यांना त्यानंतर प्रतिक्षलयात पुढील प्रसूतीसाठी नेण्यात आले.तिथे डॉक्टरांच्या चमूच्या प्रयत्नातून या मातेने दुसर्या बाळाला जन्म दिला.या प्रसूतीनंतर बाळ व माता सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.माता व बाळांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात तात्काळ पाठविण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.दरम्यान मातेची व बाळांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button