breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच आजपासून (मंगळवारी) पुण्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे हेल्मेट सक्तीला हेल्मेट विरोधी कृती समितीकडून विरोध करण्यात आला असून यासंदर्भात नवी पेठेतील गांजवे चौकाजवळील आचार्य आनंदॠषीजी रक्तपेढीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील वाहतूक समस्या तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातांची वाढती संख्या विचारात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नोव्हेंबर महिन्यात शहरात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला होता. हेल्मेट वापरल्यास गंभीर स्वरुपाच्या अपघातातील जीवितहानीचे प्रमाण कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. १ जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी म्हटले होते.  यानुसार आजपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे.

‘हेल्मेट परिधान केल्याने गंभीर स्वरुपाची दुखापत टाळता येते. आगामी वर्षांत रस्ते अपघात कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार असून दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे’, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे.

दुसरीकडे हेल्मेटसक्तीविरोधात आचार्य आनंदॠषीजी रक्तपेढीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यास कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, अंकुश काकडे, संदीप खर्डेकर, शांतीलाल सुरतवाला, रुपाली पाटील, धनंजय जाधव, सुरेश जैन, मयूरेश अरगडे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

दरम्यान,  अपघात प्रवण क्षेत्राची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महापालिकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अपघात प्रवण क्षेत्रांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत, जेणेकरुन या भागातील अपघात कमी होतील. यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button