breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेकडून नागरिकांच्या मिळकतींवर आता थेट जप्ती येणार

  • लवकर मिळकत कर भरणा करण्याचे आवाहन
  • सह आयुक्त दिलीप गावडे यांची माहिती

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश मिळकतधारकांनी 31 डिसेंबरच्या मुदतीत मिळकत कर भरलेला नाही. अशा मिळकतधारकांनी लवकरात लवकर मिळकत कर भरणा करावा. अन्यथा महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 2 लाख 77 हजार 286 मिळकतधारकांनी 368.56 कोटी मिळकत कराचा भरणा केला आहे. त्यापैकी 1 लाख 36 हजार 579 मिळकतधारकांनी 161.47 कोटी कर ऑनलाईन सुविधेचा उपयोग करून भरला आहे. महापालिकेने 31 डिसेंबर अखेर मिळकत कर भरण्याची मुदत दिली होती.

मात्र, त्याला बहुतांश मिळकतधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यातील 73 अधिकतम थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याचे अधिपत्र निर्गत केले आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर मिळकत कर भरणा करावा. अन्यथा कर संकलन विभागाकडून लवकरच जप्तीची कारवाई केली जाणार आहे, असे आवाहन सह आयुक्त गावडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button